गळफास घेवुन युवकाची आत्महत्या.!



तळोधी(बा.)

              नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत, तालुक्यातील चिंधिचक येथील युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६.३०० वा उघडकीस आली. 
 मृतक युवकाचे नाव पुर्णचंद्र मधुकर सडमाके वय 32 वर्ष असुन रा.चिंधिचक येथील रहवासी आहे.
       सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, दिनाक २६/०१/२०२१ चे रात्रोच्या सुमारास मृत्तक पूर्णचंद्र घरून कधी निघून गेले हे कळलेच नाही. मात्र सकाळी गावालगतच असलेल्या गुराचे गोठ्यामधे गळफास घेवून अडकलेल्या अवस्थेत सकाळी दिसल्याने एकच खळबळ उडाली.
आत्महत्या करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
          मृत्तकाचे पच्छात कुटुंबात दोन भाऊ, बहिन, आई, वडिल, असा आप्त परिवार असुन चिधिंचक येथिल भाजपाचे युवा कार्यकर्ते  जगदिश सडमाके यांचे चुलत भाऊ होते. 
पूर्णचंद्रच्या जाण्याने गाव परिसर व सडमाके परिवार शोकसागरात बुडालेला आहे.
          सदर घटनेची माहिती नागभिड पोलीसानां दिली असता पो.काँ. सावुसाकडे  यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरि  तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय  नागभिड येथे नेण्यात आले
 घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!