हळदीकुंकू कार्यक्रमातून महिलांना मास्क,सॅनीटायझर व हॅन्डवॉश वाण म्हणून वितरण.



   
तळोधी  (बा.)
जि.प.शाळा भिकेश्वर शाळेचा
 उपक्रम.
व्यसनमुक्त होणाऱ्या पालकांचा केला सत्कार.
 नागभीड पंचायत समिती अंतर्गत येणारी भिकेश्वर जि.प.शाळेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणराज्य दिनाचे औचित्य साधत कोरोना मुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देत शाळेतच हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले यात मातापालकांनी सहभाग घेतला होता. यात वाण म्हणून कोरोना विषाणू शी लढण्यासाठी मास्क,सॅनीटायझर,हॅन्डवाश चे वाण म्हणून वितरण करण्यात आले.
   यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून तंबाखू मुक्त शाळा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक हरीचंद्र पाल सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागभीड केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. मंगला कोतकोंडावार मॅडम,अवॉर्ड संस्थेचे गुणवंत वैद्य सर,शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्ष संचिता संजय ठेंगरी,उपाध्यक्षा प्रिया नितीन कसार,आपुलकी फाऊंडेशन चे संचालक किशोर मुळे, राजू ठाकरे,पराग भानारकर यांची उपस्थिती होती.
     यावेळी व्यसनमुक्त झालेल्या  राजू मधूकर कसार, चेतन महादेव  ढोंगे, महेश श्रीहरी माटे, जयंत अशोक कोरडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यावेळी व्यसनमुक्त हॊणाऱ्या गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व व्यसन होते तेव्हा व व्यसन सुटल्यानंतर झालेले बदल मनोगतातून व्यक्त केले. केंद्रप्रमुख कोतकोंडावार मॅडम यांनी शाळेच्या या उकक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सहारे मॅडम सहायक शिक्षिका धामणगे मॅडम यांचे विशेष कौतुक करीत उपक्रमाला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष स्थानी उपस्थित असलेले पाल सर यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करीत लोकगीतातून तंबाखु चे हानिकारक परिणाम उपस्थित असलेल्या पालकांच्या समोर मांडले व व्यसनातून आपली आर्थिक व आरोग्य संपदा कशी लोप पावत जाते याचे मार्गदर्शन केले... यानंतर उपस्थित माता पालकांना हळदीकुंकू देत वाण म्हणून पारंपरिक पद्धतीला फाटा देत कोरोना विषाणू व स्वच्छता या बद्दल जाणीव जागृती व्हावि यासाठी आरोग्य हित लक्षात घेता वाण मास्क,सॅनीटायझर व हॅन्डवॉश चे वितरण करण्यात आले.
    वाणा मध्ये आरोग्यविषयक वस्तू मिळाल्याने अनेक माता पालकांनी शाळेचे आभार व्यक्त केले.. शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सहारे मॅडम यांनी केले तर संचालन व आभार धामणगे मॅडम यांनी केले.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी धामणगे मॅडम,सुकेशनी उके व गावकरी मंडळींनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!