प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ध्वजारोहण संपन्न..
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
ग्रामपंचायत निवडणुका होऊन आरक्षण नुसार सरपंच पद भरण्यात आले नसल्यामुळे यावेळी प्रशासकीय अधिकारी यांच्यामार्फत 26 जानेवारी चा ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रशासकीय अधिकारी असलेले डॉ. जांभूळे पशुधन विस्तार अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडण्यात आला तसेच गुजरी चौक पटांगण येथील ग्रामसेवक गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी माजी सरपंच दीक्षा भगत, विद्यमान ग्रा.पं.सदस्य साईस वारजूकर, निखिल गायकवाड, संजय ननावरे, माजीद शेख, अशोक चौधरी, नितीन सावरकर, शंकर शेळकी, सविता चौधरी, गीता रानडे, शशिकला ढोक, शारदा गायकवाड, रंजना उईके, सपना घडसे, बेबीबाई डहारे वंदना सहारे सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी मंडळ व विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!