दारू माफीया A.N. व दारू तस्कर B.P. यांचा दारू पुरवठा नियमितपणे सुरूच
यांच्यावर कार्यवाही करणार तरी कोण ?
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमुर तालुक्यामध्ये दारूचा खुलेआम पणे व्यवसाय सुरू असल्याचे दिसुन येत आहे.दारू माफीया A.N. (हिंगणघाट) यांचा आजही चिमुर तालूकाच नाही तर मुल,नवरगाव सिंदेवाही,नागभिड, पर्यंत बिनधास्त पणे दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या दारू माफियाला मंत्र्याने व मोठे अधिकारी यांनी काम दिला आहे.अशा प्रकारची दारू विक्रेत्या कडून सर्रासपणे चर्चा जोरदार सुरु आहे.जसी चंद्रपूर मध्ये ७ते१० गाड्या एकाच वेळेत येत असतात .अश्याच प्रकारे N.A.या दारू माफीयाचे शुध्दा गाड्या चिमुर तालूक्यात येत असतात.तर मग यांच्यावर कार्यवाही करणार तरी कोण ? हा मोठा प्रश्न जनतेत पडला आहे.या दारू माफीयाला जिल्ह्यावरूनच दारू पुरवठ्याचा काम देण्यात आला आहे. अशी शुध्दा चर्चा दारू विकणाऱ्या विक्रेत्या कडून होत आहे.म्हणूनच बिनधास्त पणे या दारू माफीयाचा दारू पुरवठा घर पोच होत आहे.छोट्या दारू विक्रेतेला स्थानिक पोलीसानी सुचणा देण्यात आल्या कि तुम्ही फक्त A.N कडूनच दारू घेण्यात यावे अश्या प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत अशी सुद्धा जनतेत चर्चा सुरु आहे.अश्या प्रकारच्या जर सुचना मिळत असेल तर या दारू माफीया ची दारू कोण पकडणार हा मोठा प्रश्न आहे. व सागण्यात आले आहे कि तुम्ही बिन धास्त पणे धंदा करा.जर कोणी तुमची दारू पकडली तर मला फोन करा.मि बगुन घेतो ते मग एल.सी.बी. असो की स्थानिक पोलीस यांना मी बगतो.काही अटी वर स्थानिक दारू विक्रेता हे जोरात दारू चा धंदा करीत आहे.माझ्या क्षेत्रात फक्त माझीच दारू चालेल अशी सुचना देण्यात आली आहे.म्हणूनच यांची दारु पकडण्या ची कोणाची हिंम्मत दिसत नाही. संपूर्ण चिमूर तालुक्यात दारूच्या दरोज ८ ते १० गाडी तालुक्यात आणि चिमूर तालुक्यातील परीसरात जात असल्याची चर्चा होत आहे. याच बरोबर दुसरे सुध्दा लपून छूपून दारू तस्कर दारुची तस्करी करीत आहे.प्रत्येक गावात दारू चा नंगा नाच सुरू आहे. पान टपरी, हॉटेल,दुकानामध्ये अवैधरित्या दारू बिनधास्त पणे विकली जात आहे.बाजार चौक,बस स्टॉप,शाळा,पुलीस चौकी किवा दवाखाना असो या परीसात खुले आम पणे दारू विक्री सुरू असते.ज्या पान टपरीवर व हॉटेल मध्ये पोलीस बसतात त्यांच्या समोरच दारू विक्री करीत असतात. अश्या प्रकारचे प्रकरण पाहायला मिळत असतात. दारू माफीयाच्या गाड्या येवड्या वेगाने येत असतात कि कधी ही मोठा अपघात होऊ शकतो.या अगोदर शुध्दा दोन-तीन वेळा या दारू माफीया गाड्याचे या परीसरात अपघात झाले आहेत.
तर दुसरी कडे दारू तस्कर B.P. (मोटेगाव) यांची शुध्दा नेरी परीसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा नेरी परीसरात होत आहे.या दोघाना काही दिवसा अगोदर भिसी पोलीस स्टेशन अंर्तगत अटक करण्यात आली होती.वरूनच पुर्ण पने सेटींग झाल्याची चर्चा होत आहे.दारूबंदी पथक चंद्रपुर यांनी शुध्दा हात वर केल्याचे समजले जात आहे.तर स्थानिक पोलीस स्टेशन चा पुर्ण पणे यास आशिर्वाद असल्याचे समजते म्हणूनच पुरवठा करनाऱ्यांना सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे.त्याचबरोबर दारू तस्कर हेच दुसऱ्या दारू तस्करांच्या वाहनांना दारू तस्करच अडवून विचारपूस करीत आहे. आणि पोलीस प्रशासन सुस्त बसलयाचे दिसून येते आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!