प्रजासत्ताक दिनानिमित्त

प्रजासत्ताक दिनानिमित्त
  

लेख :( भारती कोंतमवार) 
२६ जानेवारी हा दिवस आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.१५ऑगष्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला व २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारतात स्वतःचे संवीधान तयार झाले व भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र झाले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या दिवसांपासून भारतात लोकशाही पद्धतीची राजवट आली.
     भारतीय राज्यघटना व तिचे उद्दिष्टे यांचे स्मरण करून ती अधिक मजबूत करण्यासाठी कृती संकल्पाचा आजचा दिवस.
    भारत आशीया खंडातील प्रमुख प्रजासत्ताक आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत असलेले राष्ट्र. 
     संवीधान नीर्मीतीसाठी २ वर्ष ११ महिने  १८ दिवस कामकाज चालले व २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संवीधानास मान्यता मिळाली व २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत घोषणा झाली.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून घटना तयार केली. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते.
 देशासाठी सर्वस्वाची होळी करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून आपल्या संवीधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिले.त्याचप्रमाणे ते स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपल्या भारतीयांचे खरे कर्तव्य व देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांसाठी खरी आदरांजली .🙏🏻🙏🏻
   {भारत माता की जय }
       सौ.भारती कोंतमवार,मुल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!