सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध समस्याचे गृहमन्त्री अनिलजी देशमुख यांना निवेदन

सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कांग्रेस चा वतीने सिंदेवाही तालुक्यातील विविध समस्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  अनिलजी देशमुख यांना निवेदन


सिंदेवाही प्रतिनिधि

सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांना दिले.निवेदनात खालील मागण्या सादर करण्यात आल्या..
१)आगामी येणाऱ्या नगरपंचायत/नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद च्या निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सिंदेवाही तालुक्यासाठी संगणीकृत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे.तरी,पक्षाच्या माध्यमातून पक्ष कार्यालयाची व्यवस्था करण्यात यावी.

२)सिंदेवाही तालुक्यातील तालुका स्तरावरील सर्व समित्यांवर सक्रीय कार्यकर्त्यांची नावे देण्यात आलेली आहेत करिता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे विविध समित्यांवर देण्यात यावी.

३)सिंदेवाही तालुक्यात संपर्क मंत्र्यांचा दौरा लाऊन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात यावी.

४) )सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे पिकांवर मावा,तुळतुळा यासारख्या रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करण्यात यावा.

५)सिंदेवाही तालुक्यातील घोडाझरी उपविभागीय कार्यालय नावापुरतीच आहे.हे कार्यालय उघडे आणि कर्मचारी मोकाट अशी परिस्थिती आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.

६)ग्रामीण पाणीपुरवठा व सिंचाई उपविभाग सिंदेवाही यांच्या कार्यालयात ठेकेदार मस्त,कर्मचारी मालामाल आणि अधिकारी सुस्त अशी अवस्था आहे.

७ )पंचायत समिती सिंदेवाही येथील संवर्ग विकास अधिकारी यांचे मनमानी कारभार चालत असतो.या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.संबंधित कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात नियमित हजर नसतात.अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.

८)सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात आहे.सिंदेवाही तहसील महसूल विभागाचे तहसीलदार याकडे डोळेझाक करीत आहे.

९) सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत.OPD ला वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि बाहेरून ये-जा करीत असल्यामुळे वेळेच्या आधीच मुख्यालय सोडतात.स्थायी वैदकीय अधिकारी बरेच दिवसापासून रिक्त आहे.सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय अनेक समस्याने ग्रासलेले आहे करिता,रुग्णालयाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी.सिंदेवाही येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करून आरोग्य सुविधा सुधारण्यात याव्यात.

१०)सिंदेवाही तालुक्यातील पशु वैदकीय अधिकारी गव्हारे नेहमीच सुट्टीवर असतात त्यामुळे पशु वैदकीय रुग्णालय परिचर सांभाळताना दिसतात.पुरेसा औषध साठा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

११)सिंदेवाही नगरपंचायतीत लोनवाही ग्रामपंचायत व इतर गावे जोळून सिंदेवाही नगरपंचायतेला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा.

१२)सिंदेवाही शहरालगत चंद्रपूर-नागपूर रोडवरील रस्ते अत्यंत खराब होऊन त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे,या रोडवर नेहमी अपघात होत असतात.सिंदेवाही शहरातून हा रस्ता असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.या रस्त्याचे रुंदीकरण करून रोडवरील खड्डे बुजवून स्पीड ब्रेकर देण्यात यावे.

१३)चंद्रपूर-नागपूर हायवेवरील नहरावरील प्लाट धारकांचे रोडवरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे.

१४)सिंदेवाही शहरात मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने अद्ययावत शासकीय वाचनालय व अभ्यासिका सुरु करण्याबाबत.

१५)चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यासाठी प्रस्तावित असलेले कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावे.
१६)सिंदेवाही तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत व पोलीस बऱ्याच दिवसापासून जुन्या अवस्थेत असून मोडकळीस आलेली आहे.नवीन अद्ययावत पोलीस स्टेशन कार्यालय व पोलीस वसाहत करिता निधी मंजुर करण्यात यावा.
१७)समस्याग्रस्त सिंदेवाही शहर तसेच तालुक्यातील लहान- लहान खेड्यापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पोहचविण्यासाठी तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वरील मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या.जेणेकरून पक्ष मजबूत होईल तथा कार्यकर्ता सक्षम होईल.
या प्रसंगी सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष दामोधर नन्नावार, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष मनोज कुमार सैनी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका सिंदेवाही चे सचिव- वी . एम . सैयद ,राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मुजीब उल्ला शेख, राष्ट्रवादी कांग्रेस समाज कल्याण सेलचे तालुका अध्यक्ष बाबूलालजी डांगे, लोनवाही राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष राहुल गंडाईत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वाकल चे अध्यक्ष पितांबर नागदेवते ,अंबादास कोसे , रंजीत निकूरे तथा राष्ट्रवादी कांग्रेस सिंदेवाही तालुका चे पदाधिकारी तथा कार्यकर्ता गण मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!