निवडणूक निकालाकडे मतदारांचे लक्ष.

निवडणूक निकालाकडे मतदारांचे लक्ष.

 तालुक्यात शांततेत मतदान.

मूल (प्रकाश चलाख)

 तालुक्यात काल ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत पार पडले. मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेऊन आपला हक्क बजावला. आता प्रतिक्षा फक्त सोमवारच्या निकालाकडे असून ग्रामीण भागात  निवडणुकीत अतिशय चुरस बघावयास मिळणार आहे.




मूल तालुक्यात एकूण 35 ग्रामपंचायत साठी काल शांततेत मतदान पार पडले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 274 उमेदवारांचे मतपेटीत भाग्य बंद झाले असून आता निकालाची प्रतीक्षा अपेक्षित आहे ालुक्‍यात एकूण 51 हजार 677 ग्रामपंचायत मतदार होते. त्यापैकी 43 हजार 414 मतदारांनी मतदानात भाग घेऊन आपला हक्क बजावला. मतदानाची तालुक्यांची एकूण टक्केवारी 84.01  असून समाधानकारक मतदान पार पडले.

तालुक्यातील अनेक गावात प्रमुख्याने काँग्रेस, भाजपा  या पक्षात लढत असून काही ठिकाणी अनेक पक्षांनीही भाग घेऊन ही ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली आहे. यात युवकांचा व सुशिक्षित बेरोजगारांचा जास्त भरणा असून ग्राम परिवर्तन काळाची गरज असल्याचे अनेक मतदारांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत बरेच ठिकाणी चुरस निर्माण झाली. यात अनेक युवकांनी व सुशिक्षित वर्गाने आपला पाठिंबा दर्शविला आहे.

काल शांततेत ग्रामपंचायत निवडणूक पार पडली असून कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वृत्त आहे. तसेच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन यंत्रणा राबविल्याने सगळीकडे उत्साहात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आता फक्त मतदारांचे लक्ष दिनांक 18 जानेवारी रोज सोमवारला होणाऱ्या निवडणूक निकालाकडे असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

प्रमुख पक्षांचे लक्ष ग्रामीण भागाकडे.

"काँग्रेस, भाजपा या पक्ष्यांचे लक्ष ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे लागले  असून ग्रामपंचायत आपलेच पक्षाच्या ताब्यात राहावी यासाठी पक्षाकडून जोर लावण्यात आला होता. परंतु मतदारांनी जनतेची सेवा करण्यासाठी व विकासासाठी कोणाकडे कौल दिला हे निवडणूक निकालावरूनच स्पष्ट होईल."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!