रेती माफियांचा चिमूर तालुक्यात बघावे तिकडे मोठ्या प्रमाणात सुडसूडाट
तहसील चे अधिकारी सुद्धा झाले माफिया
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - संपूर्ण महाराष्ट्रात रेती घाट लिलाव प्रक्रियेवर बंदी असतांना खुलेआम चिमूर तालुक्यामध्ये काही तहसील चे अधिकारी तथा पटवारी यांचा समावेश आहे असे वारंवार दिसून येत असून सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी तथा तहसीलदार यांनी नेमणूक केलेली रात्र व दिवसा पाळीचे पथक रेती माफियांवर कारवाई न करता खुलेआम दिवसा व रात्रोला अगदी तहसील कार्यालयासमोरून १० चाकी हायवा वाहनाने रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. असे असतांनाही तहसीलदार उप विभागीय अधिकारी कारवाई का करीत नाही यावर ? दिसून येत आहे आणि लहान रेती माफियांवर कारवाई केली जाते. आणि लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद असलेल्या मोठ्या रेती माफियांवर कारवाई केली जात नाही.असे का ? अगोदर नदी पत्रातून अवैधरित्या रेतीची शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या शेतात साठवणूक करणे आणि त्या साज्यातील पटवारी डोळ्यांनी बघून आंधळी कोशिंबीर का खेळत असतात याचा सुद्धा तालुक्यातील जनतेच्या डोळ्यासमोर ? उपस्थित झाला आहे. त्या रेती साठ्यावर अधिकाऱ्यांच्या संगम मताने कारवाई करून त्यावर लिलाव प्रक्रिया करून प्रति ब्रास रेती सोन्याच्या दराने बोली पार पाडली जात आहे. हि रेती गोर - गरीब सर्वसामान्य जनतेला विकली जात नसून जास्त मागणी असलेल्या मोठ - मोठ्या शहरांमध्ये हि रेती विकल्या जात आहे.एकिकडे ग्राम पंचायत निवडणूक सुरु आणि जिल्ह्यामध्ये आचार संहिता सुरु असतांना या रेती माफियांवर आशिर्वाद तरी कुणाचा असावा आणि यांच्यावर कारवाई का केली जात नाही.असे जर नेहमीच सुरू राहिले तर पिण्याच्या पाण्याची पातळी हि खोलवर जाईल आणि भिषण पाणी टंचाई निर्माण होईल.आणि मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. याकडे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन गोपनीय पथक नेमावे व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करून शासनाचा महसूल बुडविण्यापासून बचाव करावे अशी सामान्य जनतेकडून मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!