मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेच्या वतीने "राष्ट्रीय युवादीन" संपन्न.
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेच्या वतीने "राष्ट्रीय युवादीन" संपन्न.
मूल :- मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील वर्षा पासून अविरतपणे राबविला जात आहे.
त्याच अनुषंगाने दिनांक १२ जानेवारी २०२१ ला राष्ट्रीय युवादीना निमित्य मूल तालुक्यातील बोरचांदली, चिचाळा, राजोली , बेंबाळ, मोरवाही, सुशी, भेजगाव चांदापूर, भवराळा, डोंगरगाव इत्यादी गावांमध्ये,
युवकांना संघटित करून युवा मंडळांची स्थापना करण्यात आली, शाळकरी विद्यार्थी व गावातील युवकांना शिक्षणाचे महत्त्व तसेच रोजगारा संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा साहाय्यक अधिकारी शुभांगी रामगोणवर, संदेश रामटेके, दिनेश कामतवार, आकाश गेडाम व मॅजिक बस संस्थेने नेमणुक केलेले प्रत्येक गावातील समुदाय समन्वयक यांनी प्रयत्न केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!