घरो - घरी नळ योजना असून सुद्धा पिण्याचे पाणी घ्यावे लागते विकत
प्रभाग क्रमांक. ११ वासीय जनतेनी नळाच्या व्हॉल ला लावला ताला
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - गेल्या १५ दिवसांपासून चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव बेगडे या प्रभाग क्रमांक. ११ मध्ये नळाचे पाणी पिण्याअयोग्य आणि काळपट येत असून ३ किमी अंतर गाठून पिण्यासाठी पाणी विकत घेतले जात आहे.याबाबत अनेक तक्रारी केल्या गेल्या असून सुद्धा नगर परिषदेला याचा विसर पडला आहे.नगर परिषदला नगर परिषद होऊन ५ वर्षे पूर्ण झाली.नगर सेवकांचा ५ वर्षीय कार्यभार संपन्न झाला. आता शासकीय अधिकारी यांच्या विरोधात तक्रार तरी कुणाकडे करायची असा ? उपस्थित झाला आहे. दैनंदिन होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल तरी कधी याचा विचार चिमूर शहर वासीय जनतेला पडला आहे. नगर परिषद मुख्याधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना विसर का पडला असावा याचा विचार जनता करू लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!