मनसेचे राज्य सरचिटनिस हेमंत गडकरी यांनी सामन्यरुग्नालय भंडारा येथे दिली भेट

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी  ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दिनांक. 14/01/2021 जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात 10 निष्पाप बालकांचा अंत झाला मात्र 7 बालकांना वाचविण्यात यश आले या बालकांना वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या अजित कुरझेकर व बबन मांतुटे यांना त्यांनी या भीषण वेळी दाखविलेल्या धेर्या बद्दल मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुक केले, यावेळी सिव्हिल सर्जन प्रमोद खंडाते, भंडारा मनसे जिल्हा अध्यक्ष नितीन वानखेडे, उपजिल्हाअध्यक्ष शैलेश गजभिये, शहर अध्यक्ष नितीन खेडीकर, मनविसे नागपूर शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, उपाध्यक्ष दत्ता साकुलकर, मौदा तालुका अध्यक्ष शेषराव भाकरे, रवी मानकर व अन्य उपस्थित होते या दुदैवी घटनेबद्दल डॉ. खंडाते, बडे मॅडम, व पोलीस निरीक्षक भंडारा यांचेशी चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!