आदिवासी मजुराची आत्महत्या

आदिवासी मजुराची आत्महत्या

चिखली ( गणेश कडस्कर )


 मुल तालुक्याच्या चिखली येथील संजय मडावी वय वर्षे 45 या मजुराने गावातीलच कन्हळ गाव रोडवर असलेल्या बोळीच्या  पारीवर असलेल्या मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.   
     ही घटना आज सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान घडली. मृत्यूचे कारण कळू  शकले नाही.  मृतक संजय मडावी याला एक मुलगा व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
     घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!