५ ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू
राज्यातील ५ ते ८ चे वर्ग २७ जानेवारीपासून नियमित सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती आहे.
शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
कोरोणाच्या काळात पाचवी ते आठवी चे वर्ग बंद होते. मात्र कोरोणाचे सर्व काळजी घेण्याच्या सूचना देत या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबाबत समिश्र प्रतिक्रिया उमटत असून शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही ही माध्यमांशी बोलताना ही माहिती आपल्याला माध्यमांकडूनच समजली असल्याचे सांगितले, तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय दोन दिवसात आम्ही घेऊ अशी प्रतिक्रिया दिली.



OK
उत्तर द्याहटवा