आंबेनेरी येथील स्वस्त धान्य दुकानदार रविंद्र मोटघरे यांच्यावर विनयभंगचा भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमूर तालुक्यातील मौजा आंबेनेरी येथील स्वस्थ धान्य दुकानदार रविंद्र मोटघरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा भिसी पो.स्टे.मध्ये करण्यात आला.आज दि.२४/०१/२०२१ ला सकाळी ०८:३० वाजता आंबेनेरी या गावची पिडीत महिला आपल्या मुला सोबत स्वस्थ धान्य दुकानात धान्य आनण्यास गेली असता दुकानदार रविंद्र दादाजी मोटघरे यांना या महिण्याचा स्वस्त धान्य मला द्या दुकानदार म्हणाला की माझा नौकर आला नाही.माझी कमर दुखत असल्याने तुच धान्य काढ असे सांगीतले त्या नंतर महिलेनेच पोत्यातुन धान्य काढून मोज - माप केले.कार्डात ठेवलेले पैसे पाहिले असता पैसे नसल्याने दुकान दाराला सांगीतले कि मी आपल्या मुलाला घरी पाठवून पैसे आणून देतो.तेव्हा दुकानदार रविंद्र मोटघरे यांनी त्या महिलेला म्हटले कि 'तु' मला पैसे देऊ नकोस फक्त एक किस दे असे महिलेला म्हणाले त्यामुळे ती महिला घाबरली व तिथून घराकडे निघून आली.हे सर्व प्रकरण आपल्या भावाला व पोलीस पाटलाला सांगीतले.त्या नंतर भिसी पोलिस स्टेशन ला जाऊन आरोपी च्या विरोध्दात रिपोर्ट देण्यात आली.सदर प्रकरणात अप.क्र./कलम ५०९ लै.अ.बा.स.अधि.२०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पुढिल तपास भिसी पोलीस स्टेशन चे ठाणेदार करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!