चंद्रपुर जिल्हा मेडिकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपैथी ची सिंदेवाही येथे सभा संप्पन्न
चंद्रपुर जिल्हा मेडिकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपैथी ची सिंदेवाही येथे सभा संप्पन्न
जितेंद्र पेंदाम
पवनपार / सिंदेवाही
भारतात पाचवी पैथी म्हनुन इलेक्ट्रोहोम्योपैथी मान्यता पावत आहे .परंतु पैथीला मान्यता देत असतांना अनेक कसोट्या तुनच जावे लागते. त्यासाठी वैद्यकीय नियमाची पुर्तता करने महत्वाचे असते. आज इलेक्ट्रोहोम्योपैथी ची अवस्था तशीच आहे .
इलेक्ट्रोहोम्योपैथी अंतीम टप्यात यशाच्या शिखरावर विजयाची माळ गळ्यात घालुन इलेक्ट्रोहोम्योपैथी प्रॉक्टीशनर यांना सन्मानाने साद घालावं असं वातावरन निर्माण झाले आहे.परंतू त्यासाठी कसोटीवर खरे उतरन्याकरीता अनेक बाबीची पुर्तता करण्याकरता एक संघविचार ,मत भिन्नता बाजुला सारून, एकमत होने अत्यंत महत्वाचे आहे.
Idc ने दिलेल्या निकषावर इलेक्ट्रोहोम्योपैथी न्यायचं असल्याने महाराष्ट्र मेडिकल असोशिएशन ऑफ़ इलेक्ट्रोहोम्योपैथी संघटना जी दिल्ली मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करते .ज्यांचे अध्यक्ष जगदिश जी जगदाडे आहेत. अशावेळी ,
आपनाकडुन काय करता येइल यासाठी संम्पुर्ण जिल्यातील इलेक्ट्रोहोम्योपैथी प्रॉक्टीशनर यांची सभा नुकतीच सिंदेवाही येथे घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी इपी षडाकांत जी कवठे जिल्हाअध्यक्ष हे होते. तर प्रमुख पाहुने म्हनुन इपी राजपाल खोब्रागडे जिल्हा सरचिटनिस, इपी सातारडे ,इपी अलोने,इपी बोम्मावार,इपी हंसराज मेश्राम,इपी संतोष चौधरी तालुका अध्यक्ष,इपी नेरकर ,इपी फुरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम डॉ कॉउन्ट सीजर माटी यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करून सभेला सुरूवात करण्यात आली .
सभेत इलेक्ट्रोहोम्योपैथी च्या विविध पैलुवर ,विविध समस्यावर चर्चा करण्यात आली.
संघटन मजबुतीचे विषय याबाबत सविस्तर खलमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन इपी जितेंद्र पेंदाम यांनी केले तर प्रास्ताविक इपी राजपाल खोब्रागडे यांनी केले. आभार प्रदर्शन इपी संतोष चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन इपी क्रिष्ना बोरकर ,दमाहे,इपी क्रिष्ना गोबाडे यांनी केले.
सभेला चंद्रपुर जिल्ह्यातील इलेक्ट्रोहोम्योपैथी प्रॉक्टीशनर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!