पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - दि. 22/01/21 रोजी गोपनीय माहिती मिळाली की बोर्डा येथे प्रफुल जयस्वाल नावाचा इसम हा त्याचे राहते घरी काही लोकांना सोबत घेऊन 52 तास पत्त्यावर पैशाची बाजी लावुन हार जितचा जुगाराचा खेळ खेळत आहे अशी माहिती मिळाले वरुन सदर माहिती पोनी खोब्रागडे सा. याना देऊन त्यांचे आदेशाने व मार्गदर्शनाने जुगार रेड केली असता रेड दरम्यान 9 इसम मिळून आले असता त्यांचे ताब्यात व डावावर एकूण नगदी 49470 rs व 7 मोटार सायकल ,9 मोबाईल असे एकूण कि 4,03,020 /- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने यातील 9 आरोपी इसमा विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे
सदरची कारवाही अरविंद साळवे , पोलीस अधीक्षक चंद्रपूर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात सपोनि राहुल किटे, पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!