कुर्झा ब्रम्हपुरी येथे पतंजली योग समिती स्थापना व भारत स्वाभिमान न्यास स्थापना दिवस उत्साहात संपन्न

ब्रम्हपुरी - प्रतिनिधी ( स्वप्नील अलगदेवे )

ब्रम्हपुरी : - संपूर्ण विश्वामध्ये योगक्रांती पसरविणारे परमपूज्य योगगुरू परम् पुज्य स्वामी रामदेवजी महाराज  व श्रध्येय आचार्य बाळकृष्ण महाराज यांनी परम् पुज्य शंकरदेवजी महाराज यांचे कृपा व आशिर्वादानी ५ जानेवारी १९९५ ला कृपालुबाग कनखल येथे दिव्य योग मंदिर न्यास,'पतंजली योगपीठ, पतंजलि समिती' ची स्थापना केली व 5 जानेवारी 2009 भारत स्वाभिमान न्यास ची स्थापना केली, संपूर्ण मानवजातीला योग प्राणायमाची दिक्षा देऊन मनुष्यजीवन निरोगी निरामय बनविणे. हेच उद्दीष्ट मनाशी बाळगून परमपूज्य स्वामीजींनी एक छोटेसे रोपटे लावले.
या रोपट्याचे विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर अल्पावधीतच झाले. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात योग, प्राणायाम , आयुर्वेद , स्वदेशी स्वाभिमान , आहार ,विहार, रिसर्च सेंटर, आचार्यकुलम, पतंजलि विश्वविद्यालय, व दिनचर्येचे महत्व पोहचविण्यात पतंजली योग समिती व तिच्या संघटना यशस्वी झाल्या. याच प्रेरणेने प्रभावित ब्रम्हपुरी तालुका पतंजली योग समिती , महिला पतंजली योग समिती , पतंजली भारत स्वाभिमान न्यास , पतंजली युवा भारत संघटन , पतंजली किसान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रूक्मिणी मंदिर सभागृह कुर्झा ब्रम्हपुरी येथे पतंजली योग समितीचा २६ वा तथा भारत स्वाभिमान न्यास चा १२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मंत्रोच्चार , प्राणायम व योगासन सुर्यनमस्कार याद्वारे कार्यक्रमाची सुरूवात झाली. तदनंतर होमहवनादी कार्यक्रमातून परिसर शुद्धता करण्यात आली . याप्रसंगी पतंजली योग समिती चंद्रपूर जिल्हा प्रभारी श्री भगवानजी पालकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी मनोगतातून पतंजलि योग समिती व पतजलि योगपीठ व्दारा  निष्काम सेवा, साधना, संघर्ष व स्वस्थ व निरोगी , भारताची विश्व योग गुरु कडे वाटचाल ,पतंजली योगपीठाचे कार्य तथा भविष्यकालीन वाटचालीची दिशा स्पष्ट केली तद्वतच ऑनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षण , रोग चिकित्सा शिबीर तथा YCB प्रशिक्षणाची नोंदणी करून प्रत्येकानी योगप्रचार करावा ल स्वावलंबी बनावे असे आवाहन केले.
         पतंजली भारत स्वाभिमान न्यास ब्रम्हपुरी तालुका प्रभारी श्री भगवानजी कन्नाके यांनी योगप्राणायमाचे कोरोना महामारीच्या काळातील महत्व व स्वदेशी भावना जागृत करण्याचे महत्व विषद केले. याप्रसंगी सर्वश्री नरेश ठक्कर पतंजली योग समिती ब्रम्हपुरी तालुका प्रभारी , हरिश्चंद्र टिकले किसान सेवा समिती तालुका प्रभारी , स्वप्निल अलगदेवे तालुका प्रभारी युवा भारत संघटन ,डॉ. नरेश बावनकुळे तालुका चिकित्सक प्रकोष्ठक प्रभारी , सुभाष माहुरे तालुका मिडिया प्रभारी , हरिराम सेलोकर मिडिया सहप्रभारी , मधुकर खेत्रे  कुर्झा योगकेंद्र संचालक , योगसाधक  भालचंद्र नाकाडे ,रामकृष्ण थोटे , देविदास चिंचेकर , तेजराम येरणे , नामदेव चोले , मारोती कार , कमलाकर झुरमुरे , अर्चना उराडे , रश्मी ठक्कर , माधुरी खेत्रे , तुकाराम कामते व बालगोपाल विद्यार्थी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!