मूल तालुक्यातील कोंबड बाजारावर कारवाईची मागणी


प्रतिकात्मक फोटो

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात अवैध कोंबडबाजार भरविल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती असून पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे.
कोंबड्याच्या झुंज लावणे त्यावर जुगार खेळणे यावर शासनाची बंदी आहे. मागील काही महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोंबडबाजार सुरू आहे. हा कोंबड बाजार मूल तालुक्यातही सुरू असून मूलच्या आजूबाजूला नियमित रित्या दर बुधवार आणि रविवार ला भरविल्या जाते. यापूर्वी चौखंडे हेटीकडे असा बाजार भरला असताना नागरिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या कोंबडबाजार वर धाड मारत कारवाई केली होती. यानंतर कोंबडबाजार भरविणार्‍यांनी आपले निश्चित एकच स्थळ न ठरविता एक दिवस आधीच संबंधितांना फोन करून स्थळ सांगितल्या जाते आणि तिथे कोंबडबाजार भरविला जात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी ताडाळा रोडवरील महाबीज जवळील परिसरांमध्ये कोंबड बाजार भरविला गेला होता. दिनांक 3 जानेवारी रोजी हा कोंबड बाजार दहेगाव मानकापूर परिसरात भरविला गेला.
या कोंबडबाजारात बेकायदेशीर जुगार खेळला जात आहे. कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!