ग्राम पंचायत ऊश्राळा मेंढा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नागभीड (प्रतिनिधी )
ग्रामपंचायत ऊश्राळा,मेंढा येथे ग्रामपंचायत तथा गावातील महिला याच्या सहकार्यातुन सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी उपसरपंच जयश भाऊ लोंढे ,अध्यक्ष सरपंच तथा जिल्हा अध्यक्ष हेमंत लांजेवार सरपंच सेवा महासंघ, प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य कु किरण डोलीकर, पोर्णिमा बोरकर,शेवंता बन्सोड माजी सरपंच डोलीकर ताई ,माजी सरपंच सेंडे जी, तंटा मुक्त अध्यक्ष यासवन्त लोंढे,पोलीस पाटील विनोद सयाम, जगदीश लोंढे ,शिवणकर सर याचा उपस्थित पार पडला. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनाबद्दल व त्यांनी अथक परिश्रमातून देशात महीलांना शिक्षणाचा कसा अधिकार मिळवून दिला,या बद्दल श्री हेमंत लांजेवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!