दिवा मिसेज इंडिया 2021' स्पर्धेत नागभीड च्या प्रिया लांबट चमकल्या




नागभीड (यश कायरकर) 
       मॉडेलिंग व फॅशन चा विकास करण्याच्या हेतूने हरिद्वार येथे हॉटेल गार्डीनिया येथे अस्तित्व एंटरटेनमेंट च्या संस्थापिका अर्चना शर्मा उनीयाल यांच्या वतीने मिस व मिसेज इंडिया 2021 या मॉडेलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यक्रमाला बॉलीवुड ची अभिनेत्री शफाका नाज व टेरो कार्ड स्पेशालिस्ट मोनिका बन्सल परीक्षक म्हणून उपस्थित होत्या.
    या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातल्या विविध राज्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात महाराष्ट्रातुन केवळ तीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता...यात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील लांबट ज्वेलरी च्या संचालिका प्रिया राहुल लांबट यांनी दिवा मिसेज 2021 या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
  त्यांच्या या यशाने नागभीड च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..नागभीड क्षेत्रातून मॉडेलिंग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींच्या त्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!