शंकरपूर येथील आधार केंद्राची तांत्रिक अडचण दूर करून केंद्र सुरू करा.. अशोक चौधरी ग्रामपंचायत सदस्य...


 
 
शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
येथील एका महाऑनलाईन ई सेवा केंद्रा अंतर्गत आधार केंद्र सुरु होते परंतु मागील काही महिन्यापासून काही तांत्रिक अडचणी मुळे UID ने बंद केले आहे. आता कोरोना लाकडाऊन क्षिथिल केल्या नंतर जिल्ह्यातील संपूर्ण आधार केंद्र सुरु केले आहे परतू शंकरपूर येथील आधार केंद्र नसल्याने परिसरातील नागरिकांना चिमूर येथे २५ किमी अंतरावर जावे लागत आहे त्यामुळे लहान मुले, गर्भवती महिला, वयव्रुद्ध व्यक्तीसमोर येण्या जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे  चिमूर येथ येण्या जाण्यासाठी फार त्रास असून त्यात लहान मुलाला व वयव्रुद्ध व्यक्तीना चिमूर येथे आधार कार्ड केंद्रावर गर्दी होत असून परिसरातील नागरिकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे
शासनाच्या विविध कामासाठी व योजनेसाठी, विध्यार्थ्याना शालेय कामासाठी, बॅंकेतील विविध कामासाठी शेतकऱ्यांना खाते खरेदीसाठी राशन दुकानातून धान्याची उचल करण्या साठी आधार अपडेट अधारची गरज असते करिता परिसरातील जनतेची अडचण लक्षात घेऊन शंकरपूर येथील आधार केंद्राची संबधित विभागाकडून तांत्रिक अडचण दूर करून येथील जनतेची समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामपंचायत चे सदस्य.अशोक चौधरी शंकरपूर यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!