पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
शंकरपूर :(प्रतिनीधी)
येथील ग्रामपंचायत च्या वतीने रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येत असलेल्या पांदण रस्त्या च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले
सध्या शेतीचे कामे ठप्प असल्याने मजूर रिकामे होते त्यामुळे त्यांनि कामाची मागणी ग्रामपंचायत कडे केली ग्रामपंचायत ने लाखो रुपयांचा प्रस्ताव तयार करून पंचायत समिती ला पाठविला प्रस्ताव मंजूर केल्या नंतर आज या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली या कामातून गावतलावातील माती काढून पांदन रस्ता तयार करण्यात येणार असल्याने तलावाचे खोलीकरण ही होणार आहे या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती चे उपसभापती रोशन ढोक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आमोद गौरकर ग्रामसेवक गायकवाड रोजगार सेवक अविनाश वाघमारे विनेश ढोक आदी मान्यवर उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!