खा. शरद पवार यांचा वाढदिवस तालुकाभर उत्साहात साजरा
ग्रामीण रुग्णालयात, ब्लँकेट, फळ, व बिस्कीट वाटप
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - देशाचे लोकमान्य लोकनेते खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस तालुक्यातील सहा जिल्हापरिषद सह लाखांदूर ग्रामीण रुग्णालय येथे ब्लँकेट फळ, बिस्कीट. मास्क तसेच मिठाई वाटून आनंद उत्साह साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांच्या सूचनेप्रमाणे भागडी जिल्हापरिषद अंतर्गत मिलींदाजी डोंगरे यांच्या नेतृत्वात प्रा.आ. केन्द्र बारव्हा परिसरात साजरा करण्यात आला. तसेच दिघोरी येथे शंकरजी खराबे मोहराना (कुडेगाव) येथे सूरज मेंढे सरांडी येथे रोशन बनकर, उमेश राऊत, मासाळ येथे मंगेश ब्राम्हणकर. पिंपळगांव (को) क्रिष्णा शेण्डे, रेशिम पाटील परसुरामकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यामिनिताई देशमुख यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष बालूभाऊ चूंन्ने, नरेश दिवठे, देवानंद नागदिवे, शंकर खराबे,मिलिंद डोंगरे,रजनीकांत खंडारे, सुभाष दिवठे,कैलास रामटेके, बबन पीलारे, संतोष गोंधले, मनोज बडोले, सचिन बऱये, अंशुल खराबे, भुषण हुकरे,संजय नहाले, सुरेश देव्हारे,पंकज भोवते,बंडू सौदरकर,कैलास दिवटे,यशवंत कोडवते,जिकरा पठाण,विलास देव्हारे,शुभम देशमुख,दत्तू आदे,बालक शहारे,विलास ढोरे,मनोज ठाकरे,राहुंल फुंडे,सौ. सुहानी नहाले,वंदना गाकरे,सुनीता बिसेन,निमा ठाकरे,निशा बगमारे,नाना रोकडे , रजत देव्हारे,असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!