अखेर "तो" बिबटा वन विभागाच्या जाळ्यात
नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)
तालुक्यातील चीचगाव, डोर्ली परिसरात गेल्या हप्त्या भरात दोन महिलांना बिबट्याने ठार केले. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी चीचगाव डोरली , वांद्रा आवडगाव , बरड किन्ही या गावातून केली होती. बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाला देण्यात आले होते .वन विभागाच्या प्रयत्नास पाच दिवसांनी बिबट्यास पकडण्यात यश आले.
या परिसरात दिवसेंदिवस नरभक्षक बिबट्याच्या घटना वाढत असल्याने परिसरात मोठी दहशत पसरलेली होती .दि.१ऑक्टोबरला वांद्रा येथील नैतिक संतोष कुथे वय (१० )हा मुलगा गावातील काही मित्रासोबत मार्निंग वाकला केला असता बिबट्याने त्यावर झडप घालून ठार केले .तसेच डोरली येथील ताराबाई खरकाटे ह्या पहाटेच्या सुमारास शेनपुंजा टाकण्यासाठी गेले असता बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच दि.७ डिसें. ला सायत्रा श्रीराम ठेंगरी या महिलेवर हल्ला करून ठार केले .बिबट्याच्या वाढत्या दहशतीने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी रेटून धरली होती.
वन विभागाला जेरबंद करण्याचे आदेश मिळताच दि. ८ डिसें.पासून वन विभागाचे चमूने या परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पाच दिवसापासून तळ ठोकून बसले होते आज दि. १२ डिसेंबरला सायंकाळी ६.०० वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागात यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी वन विभागाचे अभिनंदन केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!