रत्नापुर बीटमध्ये पट्टेदार वाघाचा मृत्यू


रत्नापुर बीटमध्ये पट्टेदार वाघाचा मृत्यू

सिंदेवाही (प्रतिनीधी) 
रत्नापूर बीटमध्ये  नेहमीप्रमाणे गस्ती करत असताना श्री जे, एस, वैद्य यांना सकाळी 9.00 वाजता खांडला येथील बल्की देव परिसर कक्ष क्रमांक 45 मध्ये वाघ मृत्यू अवस्थेत आढळून आला, या घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक बुल्ले यांनी घटनास्थळ गाठले, घटनेची चौकशी केली, तेव्हा भ्रमणध्वनीद्वारे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी यांना माहिती दिली, तेसुद्धा घटनास्थळी हजर झालेत शवविच्छेदन केले असता, सदर मृत वाघ (मादी)चे निरीक्षण करण्यात आले, वाघाचे सर्व नखे, दात, सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळले, वाघ दोन ते तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा, सदर वाघिणीचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, शवविच्छेदन दरम्यान अवयवांचा शेरा घेण्यात आला असून, सदर नमुने तपासणी करता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, असून मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईलअसे सांगण्यात आले, सदर वाघ (मादी) शवविच्छेदन झाल्यानंतर माननीय वनाधिकारी व उपस्थित सर्व अधिकारी यांचे उपस्थितीत शव दहन करून त्याचा विल्हेवाट लावण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!