शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चा निषेध



ब्रम्हपूरी (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी शहरातील झाशी राणी चौक इथे केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच भाजप सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी डोक्यावर पडल्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात अशा या  मंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
जागतिक बाजारपेठेत काच्या तेलाच्या भाव पडले आहे तरीही मात्र भारतात पेट्रोल डिझेल शंभरीच्या जवळपास पोहचले आहेत त्याच बरोबर जीवनावश्यक वस्तू महागड्या झाल्या आहेत कोरोनाच्या या भयानक संकटात लोकांचा रोजगार हिसकवला आहे मात्र सरकार सातत्याने पेट्रोल दरवाढ करत आहे
आज शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख नरेंद्र नरड यांच्या नेतृत्वात झाशी राणी चौक इथे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या
निम का पत्ता कडवा है ... उठा उठा महागाई आली मोदी सरकार जाण्याची वेळ झाली! रावसाहेब दनवेच करायचं काय खाली डोकं वर पाय! पेट्रोल डिझेल भाव कमी झालाच पाहिजे! अशा घोषणा देण्यात आल्या
यावेळेस माजी तालुका प्रमुख नरेंद्र गाडगीलवार, मिलिंद भणारे, किशोर चौधरी रमाकांत अरगेलवार, वीणाताई घोडपागे (उपजिल्हा संघटिका), सुरेखाताई पारधी, आकाश शेंद्रे (युवा सेना तालुका प्रमुख) अमोल माकोडे (युवा सेना शहर प्रमुख)
आशिष गाडंलेवार, प्रशांत सहारे, प्रज्वल वाघमारे व सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!