राष्ट्रीय लोकअदालतीत ३४६ प्रकरणे निकाली

निकाली प्रकरनान्तर्गत ८.६७ लाखाची वसुली 

ग्रा.पं.,बँक, विज कंपनी व प्रलंबित खटल्यांचा समावेश

लाखांदूर दिवानी व फौजदारी न्यायालयाचे आयोजन

जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील ग्रामपंचायती,विविध बँका,विज कंपनी व येथील दिवानी व फौजदारी खटल्यांतर्गत प्रलंबित प्रकरने मिळुन एकुण  ३४६प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सदर प्रकरणे १२ डिसें.रोजी लाखांदूर येथील दिवानी व फौजदारी न्यायालय(क.स्तर)अंतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत निकाली काढण्यात येवून सदर निकालान्तर्गत सुमारे ८.६७ लक्ष रु.ची वसुली करण्यात आली आहे.प्राप्त माहिती नुसार १२ डिसेंम्बर रोजी लाखांदूर येथील दिवानी व फौजदारी न्यायालय (क.स्तर) अंतर्गत येथील न्यायाधीश एस.बी.साबळे व अधिवक्ता आर.जे.पिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शानात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते.या अदालतमध्ये ग्रा.पं.अंतर्गत दाखल २८८१ प्रकरणांपैकी ३३०,बँके अंतर्गत दाखल४०३पैकी ११प्रलंबित न्यालययीन खटले ८१ पैकी ०४ तर विज कंपनीच्या १४ पैकी ०१ अशी एकुण ३४६ प्रकरणे निकाली काढण्यात आले.यावेळी सदर निकाली प्रकरणांतर्गत तडजोड होवुन सुमारे ८लक्ष ६७हजार ९ रु.ची वसुली देखील करण्यात आली.दरम्यान येथील न्यायालयात ग्रामपंचायत ,बँक,प्रलंबित खटले व विज कंपनी अंतर्गत जवळपास ३३७९प्रकरणे न्याय प्रविष्ठ असुन राष्ट्रीय लोक अदालतीत ३४६ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याने न्यायालयीन प्रकरनांचा भार कमी होतांना नागरिकांना देखील दिलासा मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!