शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका वरोराच्या वतीने येथील धनोजे कुणबी सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधले आहे. दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर टेमुर्डे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उइके, जिल्हा महासचिव हीराचंद बोरकुटे,तालुका अध्यक्ष विशाल पारखी, जयंत टेमुर्डे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशीला तेलमोरे, रंजना पारशीवे, विजेंद्र ननावरे, अतुल वानखेडे, अरुण सहारे, अविनाश ढेंगळे, दिनेश मोहारे, अभिजीत कुडे, अशोक पोफळे, सुनिता नरडे, प्रदीप बुराण, मुकेश वाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!