शेतकऱ्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात शिवसेनेचे निदर्शने

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांनी शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागावी या मागणीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनीही रावससाहेब दानवे यांचे हे म्हणणे दुर्देवी आहे, असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दरम्यान नितिन मत्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली.
दरम्यान नितीन मत्ते यांनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅली काढली.  ही रॅली  थेट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय समोर धडकली. दरम्यान रावसाहेब दानवे  व केंद्र शासनातर्फे सतत केल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान  केंद्र शासन व रावसाहेब दानवे यांचे निषेध करत तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी वरोराचे ठाणेदार दिपक खोब्रागडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी रमेश मेश्राम, मनीष जेठाणी, मुकेश जिवतोडे, संदीप मेश्राम, दिनेश यादव, भूषण बुरीले, गणेश चिडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!