गांदिया बल्लारशा रेल्वे कधी धावणार - प्रवाश्यांना प्रतिक्षा

गांदिया बल्लारशा रेल्वे कधी धावणार - प्रवाश्यांना प्रतिक्षा

मुल : ( अभिलाष भिमनवार) 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात सर्वकाही सुरूळीत सुरू असताना गोंदीया बल्लारशा  रेल्वे केव्हा धावणार याची प्रवाश्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारी बल्लारपूर गोंदीया रेल्वे कोरोनाच्या काळापासून बंद आहे.राज्यात प्रवासी वाहतूकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू आहेत.खासगी ट्रव्हल्स,काळीपिवळी ट्रक्सी सुरू  करण्यात आल्या आहेत.महानगरात मेट्रो सुरू आहेत.मग गोंदीया बल्लारपूर रेल्वे सुरू करण्यात कोणती अडचण भासत आहे,असा प्रश्न प्रवास्यांनी केला आहे.
 केंद्र शासनाच्या अनुमती
नुसार राज्यात अनलॉक सुरू आहे.त्यानुसार
बस;लाल परीद्ध सुरू करण्यास परवानगी दिली आणि वाहतूक सुरळीत होऊ लागलीए याचा दाखला घेत खाजगी ट्रॅव्हल्स सुद्धा भरपूर प्रवासी घेऊन धावायला लागल्या आहेतण् परंतु बस आणि ट्रॅव्हल्स तिकीट सर्व सामान्य गरीब जनतेसाठी परवडणारी नसल्यामुळे जनतेला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहेए ग्रामीण भागात गोर.गरीब जनता कमी तिकीट लावून प्रवास करण्यास उत्सुक असतांना गरीब जनतेला दुष्काळग्रस्त परिस्थितीत सुदधा आर्थिक भुर्दंड सोसून प्रवास करणे भाग पडले आहेए ावतवदं महामारी काही प्रमाणात असताना देखील बस व खाजगी ट्रॅव्हल्स सुरू होऊ शकतात आणि मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी मेट्रो सुरू करण्यास शासन परवानगी देऊ शकते तर मग बल्लारपूर.गोंदिया रेल्वे सुरू करण्यास अडचणी काय असा प्रश्न जनते कडून केले जात आहेण् बल्लारपूर.गोंदिया याच मार्गावरून कोरबा सुपर एक्सप्रेस जेव्हा अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे  याच धर्तीवर बल्लरपूर गोंदिया रेल्वे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य जनता रेल्वेच्या प्रवासी बांधावा कडून केली जात आहेण्

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!