राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सामाजिक न्याय विभाग चिमूर तालुका अध्यक्ष पदी चंदू मंडकवार यांची नियुक्ती
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( सामाजिक न्याय विभाग ) चिमूर तालुका अध्यक्ष पदी चंदू गणपत मडकवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( सामाजिक न्याय विभाग ) प्रदेश अध्यक्ष ऍड.जयदेव गायकवाड यांच्या सूचनेनुसार पक्षाला तळामाळीपर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा व शक्ति वाढवावी पक्षाची धेय्य धोरणे पक्षाचा स्वाभिमानाणे विचार करून जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे या उद्देशाने पद देण्यात आले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रियदर्शन इंगळे सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या तर्फे हि नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्राजक्त प्रसादराव तनपुरे राज्यमंत्री , नगरविकास , ऊर्जा , उच्च व तंत्रशिक्षण आदिवासी विकास ,आपत्ती व्यवस्थापन ,मदत व पुनर्वसन , सुनील देवगावकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ,राजेंद्र वैदय जिल्हा अध्यक्ष ,सुरेश रामगुंडे चिमूर विधानसभा अध्यक्ष ,योगेश ठुने तालुका अध्यक्ष,
मुनाज शेख ,प्रियंका बहादुरे त्याचबरोबर राहुल राणे , पवन मेंडूलकर,अमोल शंभरकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!