संतामधिल सुधारक : संत गाडगे बाबा
संतामधिल सुधारक : संत गाडगे बाबा
दिनविशेष
:(सचिन वाकडे)
आपल्या कीर्तनातून तसेच प्रबोधनातून स्वच्छतेच्या संदेश देणाऱ्या गाडगे बाबांनी शिक्षणाचे जितके महत्व पटवून दिले, तितकेच महत्व स्वच्छतेविषयी पटवून दिलेले आहे. गाडगे बाबा यांच्या जन्म वडिल झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आई सखुबाई झिंगराजी जणोरकर यांच्या पोटी २३ फेब्रुवारी १८७६ ला अमरावती जिल्ह्यातील कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला.
गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना, स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
सर्वांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या मृत्यू २० डिसेंबर १९५६ ला पेढी नदीच्या काठावर वलगावजिल्हा अमरावती येथे झाला.
थोर समाजसुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी दिनी पब्लिक पंचनामा तसेच ब्रम्ह वार्ता कडून विनम्र अभिवादन...!


वैनगंगेचे पाणी, या पुस्तकातील माहिती आपल्या लोकप्रिय
उत्तर द्याहटवापेपरमध्ये