मोबाईल फोनने आपली चाळीशी केली पार
मोबाईल फोनने आपली चाळीशी केली पार
मूल:(सचिन वाकडे)
आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाला अधिक जवळचे, तसेच वापरण्यास सोपे साधन मोबाईल हेच आहे. बोटाच्या एका क्लिकवर जग जवळ आणणारे व अनेक कामात मदतगार ठरणारे मोबाईलचे वापरकर्ते हे बच्चेकंपनीपासून तर जेष्ठ नागरिकांपर्यंत आहेत. मोबाईल विकसित करून जग जवळ आणणाऱ्या मार्टिन कूपर यांच्या आज जन्मदिन (२६ डिसेंबर १९२८) आहे.
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. जगातला पहिला मोबाईल फोन विकला गेला होता, त्याचं नाव होतं "द ब्रिक." त्यावेळी त्याची किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल, अशी सुतराम शक्यताही कुपर यांना नव्हती. पहिल्या मोबाईल फोनचे वजन होते १.१ किलो तर मोबाईल फोन १३ से. मी मोठा व ४.४५ से. मी जाडा होता.
३१ जुलै १९९५ रोजी भारतात मोबाईलवरून पहिला कॉल केला गेला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकात्याच्या रायटर्स बिल्डिंगमधून नवी दिल्लीतील केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना हा कॉल केला होता. हा कॉल मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) या कंपनीच्या नेटवर्कवरून केला होता व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता.
या क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडून १९७९ साली जपानमध्ये टोकियोच्या काही भागांसाठी सेवा देणारं NTT हे जगातलं पहिलं कमर्शियल सेल्युलर नेटवर्क उभं राहिलं. १९८० च्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत संपूर्ण Automatic Cellular Network विकसित झाले. यालाच 1G असेही म्हणतात. पहिली Automatic मोबाइल फ़ोन सिस्टम ही १९८१ मध्ये विकसित झालेली Nordic Mobile Telephone System (NMTS) ही होती. इथपर्यन्त सगळे मोबाइल हे अवजड होते.
१९८८ सालापासून Handheld म्हणजेच हातात मावण्याजोगे मोबाइल अस्तित्वात आले. त्यांची किंमत स्वस्त असल्याने व वजनाने हलके असल्याने ते लवकरच जगभर प्रसिद्ध झाले. तरीही, नागरिकांसाठी पहिला फोन जवळपास बऱ्याच वर्षांनी बाजारात आला. तो होता, मोटोरोला DynaTAC 8000X. ६ मार्च १९८३ रोजी हा फोन बाजारात आला.
चाळीस वर्षात या मोबाईलने फारच मोठे अंतर कापले असून मोबाईल हे आता सर्वसामान्यांच्या हातातही विराजमान झाले असताना मोबाईल फोनने आपली चाळीशी पार केली, हे अनेकांच्या स्मरणातही राहिलेले नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!