महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक च्या दिनदर्शिका २०२१ विमोचन व सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक च्या
दिनदर्शिका २०२१ विमोचन  व सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न.


चंद्रपूर (प्रतिनिधी) 
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ दिल्ली संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) जिल्हा शाखा चंद्रपूरचा  चा दिनदर्शिका २०२१ विमोचन व सत्कार समारंभ कार्यक्रम शुक्रवार दि. २५/१२/२०२० ला काळाराम मंदिर सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्री.प्रकाश चुनारकर , राज्य सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक) हे होते. तर दिनदर्शिका २०२१ विमोचन व सत्कार समारंभ 
श्री.राजेंद्र गांधी सेवानिवृत्त शिक्षक लोकमान्य टिळक विद्यालय,चंद्रपूर यांचे हस्ते पार पाडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  श्री.दिवाकर पुद्धटवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (चंद्रपूर शहर ),
 श्री.मोरेश्वर गौरकार - जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) चंद्रपूर,
श्री.अजय बेदरे- जिल्हाकोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक) चंद्रपूर,)श्री.अमोल देठे - जिल्हा कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) चंद्रपूर, हे होते.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश चुनारकर यांनी प्राथमिकचे कार्य राज्यभर चांदा ते बांदा  पोहचले असून त्याची सुरुवात चंद्रपूरातून झाली असल्याचे म्हटले.
दिनदर्शिका २०२१ चे विमोचन करतांना राजेंद्र गांधी यांनी परिषद प्राथमिकच्या कामाची स्तुती केली व दिनदर्शिका मांडणी बद्दल परिषदेची विशेष महत्त्व विशद केले.
श्री.दिवाकर पुद्धटवार यांनी परिषद प्राथमिकच्या  पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना संघटना पदाधिकारी यांनी नियमांचा अभ्यास करून प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडण्याबद्दल आग्रह धरला.
या कार्यक्रमात श्री.पुंडलिक रासपायले परिषद  पदाधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा राजेंद्र गांधी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. सतीश दुवावार परिषद पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद चंद्रपूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मोरेश्वर गौरकार जिल्हाध्यक्ष यांनी केले.
सूत्रसंचालन श्री.अमोल देठे जिल्हा कार्यवाह यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.अजय बेदरे  जिल्हा कोषाध्यक्ष यांनी मानले.
यावेळी  चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) पदाधिकारी उपस्थित होते.
::::::::::::::::

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!