वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार



वांद्रा  (गुरुदेव वाघरे) :
            ब्रम्हपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोर्ली (चीचगाव) येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना दिनांक 3 डिसेंबर ला पहाटेच्या सुमारास घडली ताराबाई विश्वनाथ खरकाटे वय 60 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली असल्याने ताण तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
      ताराबाई खरकाटे सकाळी सेंण पुंजा  टाकण्याकरिता गेली असता वाघाने अचानक हल्ला करून ओढत नेले व जागीच ठार केले ताराबाईच्या शरीराचे वाघाने लचके तोडत दोन भागात शरीराचे विभाजन केले. यापूर्वी या परिसरात वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या असून या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. परिसरात चार पाच मोठे मोठे वाघ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून गावालगत व रस्त्यालगत असलेल्या झुडपांची साफसफाई  तसेच वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी धरून ठेवल्याने घटनास्थळी ताण तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी मेंडकी पोलीस उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!