आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भंगडीया यांनी शेतकऱ्यास दिली आर्थिक मदत
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणून सुप्रसिद्ध असून वाघांचे प्रमाण जास्त असल्याने व जंगलामध्ये रिसॉर्ट थाटल्याने आणि जंगल सफारी मोठ्या प्रमाणावर सुरु जनता जंगलाकडे धाव घेत असतात तर वन्य प्राणी जंगल सोडून गावाकडे पलायन करीत असतात. यामुळे दररोज वन्य प्राणी पाळीव प्राण्यांवर गावात शिरून हल्ले करून ठार करीत असतात. अशातच चिमूर शहरात सुध्दा पट्टेदार वाघाचे धुमाकूळ सुरू आहे.व दिनांक.२०/१२/२०२० ला प्रकाश निखाते या शेतकऱ्यांची गाय पट्टेदार वाघाने ठार केली. याची आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना माहिती मिळताच चिमूर येथील शेतकरी प्रकाश निखाते यांना आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी रमेश कंचर्लावार , मनोज निखाते व अंन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!