आज गुरू शनीची महायुती, खगोल प्रेमी ंसाठी आनंदाची पर्वणी
आज गुरू शनीची महायुती, खगोल प्रेमी ंसाठी आनंदाची पर्वणी
मूल :(अभिलाष भिमनवार)
ग्रहमालेतील दोन मोठे असलेले गुरू आणि शनी ग्रहाची आज अवकाशात महायुती बघायला मिळणार आहे. ही घटना खगोल प्रेमी ंसाठी आनंदाची पर्वणी
ठरणार आहे. ब-याच वर्षांनी हा योग जुळून आला आहे.
गुरू ग्रह शनीकडे सरकत असल्यामुळे आज सोमवारी २१ डिसेंबरला तो शनीच्याजवळ राहील व पुढे सरकत राहील . या दोन ग्रहांच्या कक्षामध्ये ६५ कोटी किलोमीटरचे अंतर आहे . परंतु त्यांची कक्षेत फिरण्याची विशिष्ट गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यासारखे भासणार आहेत . यालाच ग्रहांची महायुती असे म्हणतात . वास्तविक शनी आणि गुरूची युती ही दर २० वर्षांनी होते . परंतु हे दोन ग्रह इतक्या जवळ येण्याची घटना ८०० वर्षांनंतर यावर्षी पहावयास मिळणार आहे . या वेळी या दोन ग्रहांमध्ये केवळ ०.१ अंशाचे अंतर असेल . म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासाच्या फक्त एक पंचमांश इतके अंतर असेल .
यापूर्वी अशी महायुती ११२६ साली पहावयास मिळाली होती . तसे पाहता १६२३ सालीसुद्धा ही घटना घडली होती अशी युती २० वर्षाच्या अंतराने होणारी युती यापूर्वी २८ मे २००० मध्ये झाली होती . यापुढे ती ३१ ऑक्टोबर २०४० , ७ एप्रिल २०६० , १५ मार्च २०८० आणि १८ सप्टेंबर २१०० रोजी होईल . पैकी १५ मार्च २०८० मध्ये या दोन ग्रहांतील अंतर आजच्या इतके कमी राहील . म्हणजेच हे दोन ग्रह इतके जवळ पाहण्यासाठी पुढील ६० वर्षे वाट पहावी लागणार आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!