! श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त!! मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुदेव

!!  श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त!!
       मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुदेव दत्तांचा मृग नक्षत्रावर सायंकाळी जन्म झाला.
यावर्षी २९ डीसेंबरला श्री दत्त जयंती आहे. या दिवशी  श्री दत्ताचे तत्व पृथ्वीतलावर १००० पटीने कार्यरत असते. म्हणुन यादिवशी दत्तगुरूंची जेवढी जास्त उपासना आपण करु तेवढा १००० पटीने आपल्याला लाभ होईल. श्री दत्तात्रयामध्ये ब्रह्मा , विष्णू व महेश या तीनही देवतांची तत्वे कार्यरत आहेत. श्रीदत्तात्रयाना नीशीगंध व जूई हे फुले प्रीय आहेत. 
       आपल्या भारतामध्ये श्री दत्त अवतारांची  अनेक ठीकाणे आहेत. औदुंबर वृक्षामध्ये श्रीदत्तांचे तत्व अधिक असते.श्री दत्तामध्ये शीकण्याची वृत्ती होती म्हणून त्यांनी २४ गुरू केले. पृथ्वीतलावरील लहान लहान जीवांकडुन ते शीकले, आपण पण त्यांच्याप्रमाणे शीकण्याची वृत्ती ठेवूया
          श्री गुरुदेव दत्त आपल्याला पुर्वजांच्या त्रासापासून पण मुक्ती देतात. आजकाल श्राद्धविधीची कृती बरोबर होतं नसल्याने सर्वांनाच पुर्वजांचा त्रास असतो.
जसे
१) मुलबाळ न होणे.
२) लग्न न जुळणे  .
३)पती पत्नीचे न पटणे.
अशावेळी आपण !!श्रीगुरूदेवदत्त !! हा नामजप जास्तीत जास्त केल्याने आपल्याला पुर्वजांच्या त्रासापासून मुक्ती मिळेल असे शास्त्रात सांगितले आहे.
      !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
सौ. भारती कोंतंमवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!