आदिवासी नेते गोदरू पाटील जुमनाके यांचे निधन



राजूरा (प्रतिनिधी)
गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.
कोरोना आजारातून सावरल्यानंतर त्यांना अल्पशा आजाराने ग्रासले होते, माहितीनुसार त्यांच्यावर नागपुरात अवंती हाॅस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यात त्यांचे निधन झाले.
2019 ची निवडणूक त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून लढवली होती आणि त्यांनी मोठे मताधिक्‍य घेतले होते.
आदिवासी बहुल जिवती तालुक्याचे ते निर्विवाद नेते होते.
जिवती येथील गोंडवाना महाविद्यालयातून आज त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!