शेतकर्यांच्या आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चोने केलेे समर्थन
केंद्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चा मैदानात
तहसिलदारा मार्फत राष्ट्रपतीना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण केंद्र सरकारने भारतातल्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे बनवल्या गेले हे कायदे शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत हा आंदोलन भारतात सर्वात मोठा आंदोलन आहे असा गणला गेला आहे दिनांक ८-१२-२०२० या भारत बंद शेतकरीआंदोलनाला राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्च्याने जाहीर समर्थन केले आहे मोर्च्यातील शेतकऱ्यांवर पोलिसांमार्फत आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांवर लाठीमार व पाण्याचे फवारे मारण्यात आले तरी आंदोलन कर्त्या शेतकरीवर्गानी रस्ता सोडला नाही त्या फवार्या मध्ये आंदोलन करता शेतकरी शहीद झाला अशा क्रूर जिम्मेदार दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी शहीद झालेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या परिवाराला एक करोड रुपये देण्यात यावे भारतामध्ये शेतकरी वर्गाचा शेतातून निघालेला मालाला खर्च लागत असलेल्या खर्चापेक्षा दीडगुना जास्त रक्कम देण्यात यावी जे व्यापारी शेतकरी वर्गाकडून कमी किमतीत माल खरेदी करतात अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात ३/७ गुन्हा दाखल करून त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात यावी असा कायदा संसदेमध्ये पारित करुन अधिकारी /कर्मचारी यांनी या कायद्याची अमलबजावनी न केल्यास त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा संसदेमध्ये कायदा पारित करण्यात यावा लाँक -डाउन च्या काळात केंद्र सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदा बनवला आहे हे चुकीचे आहे जर या संपुर्ण मागण्या पूर्णपणे मान्य न केल्यास संघटनेच्या वतीने संविधानिक कायद्यात राहुन तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी ताकीत देवून बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनेच्या माध्यमातून आंदोलनकरते शेतकरी वर्गाला भारत बंदला आम्ही जाहीर समर्थन करीत आहोत असे निवेदनातून मागणी केली आहे निवेदन लाखांदूर तहसीलदारांन मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका संयोजक धर्मेंद्र मेश्राम, भारतीय विद्यार्थी मोर्चा तालुका अध्यक्ष अभिजीत मेश्राम, भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर सतीमेश्राम, भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ तालुका अध्यक्ष अश्विनी मेश्राम, भारतीय बेरोजगार मोर्चा तालुका उपाध्यक्ष अरविंद वासनिक, व बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष दीनबंधु मेश्राम, कुंदन मेश्राम,सर व राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ मंगला मेश्राम, हिेरकन्या लांडगे, हे सर्व निवेदन देतेवेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!