हिंदू संस्कृतीत गोमातेचे महत्त्व
हिंदू संस्कृतीत गोमातेचे महत्त्व
आपल्या हिंदु संस्कृतीत गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे.गाईमध्ये सर्व देवतांचा वास असतो.म्हणुनच गाय पुजनीय आहे.गाईचे दुध अमृतासमान आहे.गाईच्या दुधात औषधी गुणधर्म आहे.गाईचे दुधच नाही तर गाईच्या गोमयात सुद्धा अनेक औषधी गुणधर्म आहे.गाईच्या गोमयाने पुजेचे स्थान पवीत्र केले जाते.गाईचे गोमुत्र अनेक ते रोगांवर रामबाण उपाय आहे.पुर्वीच्या काळी गाईच्या शेणाने गोवरी बनवून इंधनासाठी त्याचा वापर केला जात असे.कोणतेही होम हवन गाईच्या गोवरीशि्वाय पुर्ण होत नाही.अशा होमातुन नीघालेल्या धुरापासुन आजुबाजुचे वातावरण शुद्ध
आणि पवित्र होते.अशी ही गोमाता म्हणजे आपल्याला ईश्र्वराने दिलेले एक वरदानच आहे.
भारतातच नव्हे तर परप्रांतात सुद्धा गाईचे खूप महत्त्व
वाढलेले आहे. काऊ थेरेपी म्हणुन नवीन थेरेपी आता परदेशात प्रचलीत झाली आहे.की गाईच्या गळ्यात जर गळा लावुन राहीले तर सर्व चींता दुर होतात.
परंतु आपली गोमाता आता धोक्यात आली आहे.सर्व देशभर गोहत्या सुरू आहे.आपल्या गोमातेला वाचवणे हे आपल्या भारतीयांचे कर्तव्य आहे. आज देशातील ३६,००० पशुवधगृहात गोवंशाची हत्त्या केली जात आहे.त्यामुळे १९४७ मध्ये ९० कोटी असलेले देशातील गोधन आता अवघे १ कोटी उरले आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो.
गोरक्षणासाठी आपण
१) गोवंशाची अवैध वाहतुक होताना आढळल्यास पोलीसात तक्रार करणे
२)गाईच्या चामड्यापासुन बनवीलेली सौंदर्य प्रसाधने (उदा.लीपस्टीक),पिशव्या,चप्पल,पट्टे,'फुटबाल 'आदी वस्तु वापरु नका.
३)गोहत्या बंदी साठी कायदा करणे.अवैध पशुवधगृहावरबंदी आणणे.
४)गोमांसाची नीर्यात रोखणे.
३३ कोटी देवतांची वास असलेली ,आपली श्रद्धास्थान असलेल्या गाईबद्दल जीतके सांगावे तीतके कमीच आहे.
म्हणुन भगवान श्रीकृष्ण स्वत:
गाईंना राखायला जायचे.म्हणुनच त्याचे नाव गोपाल पडले आहे.श्री दत्तगुरुंच्या मागे गाय उभी असते.
असे तिचे अध्यात्मीक महत्त्व पण खूप आहे.
!!जय गोमाता !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!