महामानव इ बुक कविता संग्रहाचे कवयित्री डॉ.नूरजहाँ पठाण यांचे हस्ते प्रकाशन
महामानव इ बुक कविता संग्रहाचे
कवयित्री डॉ.नूरजहाँ पठाण यांचे हस्ते प्रकाशन
जयेंद्र चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा (ता.8)-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभाग द्वारा 64 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दिनांक 14 ऑक्टोबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधी दरम्यान इ बुक कवितासंग्रह प्रकाशनाकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे भारताला योगदान या विषयावर स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या.
महामानव इ बुक कविता संग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा दि.6 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता
विदर्भातील गोंदिया येथील नामवंत कवयित्री,लेखिका डॉ.नूरजहाँ पठाण यांचे हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजवर पार पडला.
प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्रचव्हाण,उपाध्यक्ष सुजित वनकर,कोषाध्यक्ष दिनेशकुमार अंबादे,,सदस्या सौ.संगीत ठलाल
आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्तिथी होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मंगेश जनबंधु यांनी केले.तर आभार कोषाध्यक्ष दिनेशकुमार अंबादे यांनी मानले.महामानव इ बुक कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याकरिता अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभागीय पदाधिकारी सौ.सरिता रामटेके मुन्ना नंदागवळी,पंकज वानखेडे, राजरत्न गायकवाड,प्रवीण नंदागवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!