शासकीय धान खरेदी केंद्रात, शेतकरी वर्गाची लूटमार
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - शासनाने शेतकरी सक्षम व्हावं, आणि त्यांच शेती पिकाला हमी भाव,एकूण ( २५०० ) बोनस मिळणार याकरिता तालुका स्तरावर शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केले, त्याप्रमाणे शेतकरी आपले धान सदर केंद्रात आणतात. परंतु तेथील हमाल, शेतकरी यांनी वाहन मध्ये आणलेल्या मालाची उपसा करीत नाही, आणि धान काटा करताना ४० किलो प्रमाणे कट्टा (बोरा) मापं करून प्रति कट्टा १० रु हमाली घेतात. म्हणजे १ किंटल मागे २५ रु. दर हमाली घेतात, हे सर्रास लूटमार होत आहे.तसेच गाडी वाहन मधील धान बोरा उपसा हा १० रु. वेगळा हमाली खर्च स्वतःशेतकरी गाडी यांचेवाहन हमाल यांना दयावे लागते. एकूण २५+१०=३५ रु. एकूण खर्च १ क्विंटल मागे मोजावी लागते. तसेच ग्रेडर , विधुत काटा न लावता लोहा काटा लावीत असून प्रति मापं ( ४० ) कट्टा मागे १/२kg धान कपात करीत आहेत, हा सर्व प्रकार पाहता सर्रास लूटमार होताना दिसत आहे. यावर संबंधित विभाग यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकरी वर्गाची लूटमार बंद करावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!