संजीवनी फाऊंडेशन नागभिड तालुका अंतर्गत तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजविनारे थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनीमित्त व विस्तार समिती अध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य राजेश जी हजारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर वसंतराव सानप, चेअरमन संजीवनी फाऊंडेशन महा. राज्य व चांगदेव गोरक्ष भवर सचिव संजीवनी फाऊंडेशन महा. राज्य यांच्या मार्गदर्शनात संजीवनी फाऊंडेशन नागभिड तालुका अध्यक्ष मा. श्री कुंदन खोब्रागडे यांच्या तर्फे "सर्वत्र पसरलेल्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी" या उद्देशाने गिरगाव येथे तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन वेगवेगळ्या वयोगटात ( खुला वयोगट आणि १५ वर्षाखालील) ही परीक्षा अगदी सध्या आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व सोशल डीस्टंगसिन चे अंतर राखून दिनांक २९/११/२०२० रोज रविवारला घेण्यात आली. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी खुल्या वयोगटात प्रथम बक्षीस कु. मोहित दशरथ चन्ने, दुसरे बक्षीस कु. मिथुन लक्ष्मण डोंगरवार तर तिसरे बक्षीस कु. ऋषिकेश रवींद्र खोब्रागडे यांना मिळाले आणि १५ वर्षाखालील गटामध्ये प्रथम बक्षीस कु. वंश भिमराज खोब्रागडे, द्वितीय बक्षीस कु. आशुतोष ज्ञानेश्वर खोब्रागडे तर तिसरे बक्षीस कु. स्मित भिमराज खोब्रागडे यांना मिळाले.सर्व विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याला राजेश जी हजारे,. विस्तार समिती अध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन महा. राज्य, नागभीड तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मान.विनोदभाऊ बोरकर प्रशांत गायकवाड,सरपंच ग्रा.पं.गिरगाव , डॉ. नानाजी मेश्राम, ब्रम्हपुरी , श्रीमती.गिताताई अशोक बोरकर, स. ग्रा.पं.गिरगाव, कमलेशजी गोंडाने पोस्टमास्तर साहेब रत्नापुर, व कुंदन सतीश खोब्रागडे तालुका अध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन नागभिड तालुका उपस्थित होते.सामान्य ज्ञान स्पर्धेच्या रूपाने विद्यार्थी नव्या जोमाने अभ्यासाला लागतील, आणि आपले लक्ष निश्चित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. याप्रकारचे बहुमूल्य मार्गदर्शन डॉ. नाना के. मेश्राम साहेबांनी बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी फाऊंडेशन नागभिड तालुक्याचे पदाधिकारी प्रमोद डोंगरे, उपाध्यक्ष, साहिल खोब्रागडे कोषाध्यक्ष, शिरीष मेश्राम, आशिक खोब्रागडे, रोहित मेश्राम व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरे यांनी तर आभार साहिल खोब्रागडे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!