" माझी वसुंधरा " अभियान करीता जिल्हयातून एकमेव भिसी ग्राम पंचायत ची निवड
नोडल अधिकारी म्हणून कृषी अधिकारी सरोज साहारे यांची निवड
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - " माझी वसुंधारा "अभियान करीता जिल्ह्यातुन चिमूर तालूक्यातील भिसी ग्राम पंचायत ची निवड करण्यात आली.पृथ्वी,वायु,अग्नी,जल व अाकाश या पंचतत्वावर पर्यावरन व वातावरणातील बदल महाराष्ट्र शासन विभागा द्वारे " माझी वसुंधारा " अभियान राभवीण्यात येत आहे.या अभियानाकरिता कृषी अधिकारी सरोज सहारे यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात अाली. या अभियानाची सुरवात जि.प.सदस्य ममता डुकरे , प.स.सद्स्य कामडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर कलोटे सर यांचे शुभहस्ते कऱण्यात आली. व या अभियानाची प्रचार प्रसिध्दी करिता अभियानाचे youtube चॅनेल आणि फेसबुक पेज पण तयार केलेले आहे.कृपया या युट्युब चैनल ला सर्वांनी बघावे असेही यावेळी सांगितले गेले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!