चिमूर - नेरी रोडला लावण्यात येत आहे डांबरीकरणाची ठिगरं
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चिमूर - नेरी रोडवरील अध्यापक विद्यालयाजवळ खड्यांचे साम्राज्य पसरलेले होते . त्या खड्यांची डागडुजीचे काम चालु आहे. त्या खड्यांना झाडुंनी साफ करून त्या खड्यांना बुजवुन फक्त डांबरीकरणाचे ठीगर लावण्याचे काम चालु आहे .
चिमूर - नेरी हे अंतर ९ कि.मी. अंतराचे आहे .या रस्त्यांनी सिंदेवाही , नागभीड , गडचीरोली , चंद्रपुरला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होत असतो .चिमुरला उपवीभागीय कार्यालय , उपवीभागीय पोलीस अधीकारी , आदीवासी कार्यालय , उपजील्हाधीकारी कार्यालय, असल्यामुळे अनेक कामासाठी या रस्त्यांनी नागरीक ये - जा करीत असतात. अनेक महीन्यापासुन या रस्त्यावर खड्डे पडले होते .तरी याकडे कुणीही लक्ष दीले नाही . आता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम चालु आहे . खड्यांना बुजवुन चालणार नाही , डांबरीकरणाचे ठीगर लावुन सुध्दा चालणार नाही . तर नवीन या ठीकाणाहुन रोडचे काम करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत . आता सध्या येथुन डांबरीकरणाचे ठीगर लावलेले आहे . जसे शर्ट व पँटला फाटक्या ठीकाणाहुन शींपी ठीगर लावतात तसेच या रोडच्या खड्याला डांबरीकरणाचे ठीगर लावण्याचे काम चालु आहे .
अशाच प्रकारचे काम केले तर अजुन येथे काही दीवसांनी खड्डे पडतील व नागरीकांना येण्या - जाण्या साठी पुन्हा त्रास होणार आहे . व अपघातही होउ शकेल त्यामुळे या खड्यांच्या ठीकाणाहून पुर्ण १ की.मी.चे पीचींग करून डांबरीकरण करावे व या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी नागरीकाकडुन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!