मूलची सुवर्ण कन्या अवंती

लेख 
     मूलची सुवर्ण कन्या अवंती 

   पत्रकाराच्या लेखणीतून (विनायक रेकलवार)          

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी  खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गावाची , प्रदेशाची , राज्याची , देशाची ओळख खेळाडुंमुळे होत असते. म्हणून खेळाडू हा देशाचा मुख्य घटक मानला पाहिजे. आज विविध खेळ प्रकारात युवा खेळाडू आपले  नाव चमकवीत आहेत. त्यातील एक म्हणजे अवंती  अनिल गांगरेड्डीवार ही होय. शिकई मार्शल आर्ट खेळ प्रकारात आंतरराष्टीय युवा  खेळाडू असलेली अवंती मूलची शान ठरली आहे. जगाच्या नकाशावर तिने मूलचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे .म्हणून अंवती गांगरेडडीवार ही मूलची सुवर्ण कन्या आहे.
               ज्या वयात मुले मुली भातुकलीचा खेळ खेळतात ,  त्या   वयाच्या दहाव्या वर्षापासून  अवंती खेळाचा सराव करीत आहे. कणखर इच्छाशक्ती ,   प्रचंड आत्मविश्वास आणि  नागरिकांच्या प्रतिसादामुळे  तिने विविध पारितोषिके जिंकली आहेत.  अवंतीची  आई अरूणा गांगरेडीवार गृहिणी आहे, आणि  वडील अनिल गांगरेडडीवार हे जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक व योग शिक्षक  आहेत.  
             
          तिचे प्राथमिक  व माध्यमिक शालेय शिक्षण मूल मध्येच झाले .   गडचिरोली येथे बि.एस.सी चे शिक्षण पूर्ण झाले.  ती इंग्लिश मध्ये एम.ए , बि पि एड  आहे. आपल्यला खेळामध्येच करीयर करायचे आहे,  हे तिने मनाशी ठरवून घेतले आहे.  
        अवंतीने शिकई मार्शल आर्ट क्रीडाप्रकारात  पाऊल टाकले आहे .  स्पर्धेच्या युगात  प्रचंड परिश्रमाच्या जोरावर तिने या क्रीडा प्रकारात जागतिक यश मिळवले. 
            दक्षिण कोरिया येथे  पार पडलेल्या जागतिक सिकई मार्षल आर्ट स्पर्धेत अवंतीने चमकदार कामगिरी करीत चंद्रपूर जिल्हयाचे नाव जगतिक स्तरावर सुवर्णक्षरांनी कोरले आहे. तिला सुवर्णपदक प्राप्त झाले. दक्षिण कोरिया येथे 24ते29 आॅक्टोबर या कालावधीत पार पडलेल्या तिस-या जागतिक सिकई मार्षल आर्ट स्पर्धेत 19 देशाचे खेळाडू  सहभागी झाले होते. आपल्या यशाचे श्रेय ती  आई वडील ,प्रशिक्षक  संदीप पेदायली आंतरराश्ट्रीय सिकई मार्षल आर्ट प्रशिक्षक यांना  देते.
अवंती आपल्या यशाचे श्रेय  मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही देते. सुधीर भाऊंची मदत तिला अविस्मरणीय  आहे. 
         काठमांडू नेपाळ येथे झालेल्या आंतरराश्ट्रीय सिकई मार्षल आर्ट स्पर्धेतही तिने 
सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.  जागतिक स्तरावरच्या  स्पर्धेत  नऊ सुवर्ण पटक मिळविलेले आहे.अवंती सिकई मार्षल आर्ट  व नॅशनल रेफरी देखील आहे. चॅम्पीयनशिप 2018 मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले अाहे. या कोंचिग कॅम्प साठी   आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी  तिचे  मनोबल  वाढविले होते .शालेय  शिक्षणात एन सी सी फायरीग  व परेड मध्ये सुवर्णपदक विजेती राहिली आहे. 
         अवंतीला भविष्यात आर्मी वूमन किंवा पोलीस आधिकारी  बनायचे आहे.  खेळांनी
मला खूप दिलेले आहे,  मला माझी ओळख खेळांनी  दिली असल्याचे  अवंती सांगते .  
  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग तिनदा विद्यापीठ 
तर्फे आल इंडिया स्तरावर सुध्दा विद्यापीठाचा कल्लरकोट प्राप्त केलेला
आहे. ती आंतरराश्ट्रीय मॅराथान सहभागी खेळाडू सुदधा आहे. 

कबड्डीत  मुंबई विद्यापीठ संघाची कर्णधार देखील भुषवले आहे.अवंतीला शिकई मार्शल आर्ट बरोबर कबड्डी अाणि  इतर खेळांची अावड अाहे .  या सर्वा मध्ये तिने यश मिळवले अाहे .राज्य , देश  अाणि  जागतिक स्तरावरच्या क्रीडा स्पर्धेत अवंतीने सुवर्ण कामगिरी केली अाहे . अवंतीच्या यशाने मूलचा गौरव वाढला अाहे . ती मूलची शान अाहे . क्रीडा प्रकारात करीयर घडविणा-यां युवा खेळाडूं साठी ती प्रेरणादायी ठरली अाहे .देश - विदेशातील उत्तुंग कामगिरी मुळे  अवंती गांगरेड्डीवार ख-या अर्थाने भारताची, मूलची सुवर्ण कन्या  ठरली अाहे .
             
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!