अ.भा.म.सा.परिषद चिमूर तालुकाध्यक्षपदी कवी आनंद बोरकर तर सिंदेवाही तालुका अध्यक्षपदी कवी संतोष मेश्राम यांची नियुक्ती

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम चंद्रपूर यांनी साहित्यिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील चिमुर(जि. चंद्रपूर) येथील कवी आनंद हिरामण बोरकर यांची चिमूर तालुकाध्यक्षपदी तर सिंदेवाही(जि.चंद्रपूर) येथील कवी संतोष मेश्राम यांची  सिंदेवाही तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कवी आनंद बोरकर व संतोष मेश्राम यांनी साहित्य क्षेत्रातील वंचित,तडागाडातील कवी, लेखक, साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक विचारपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील कवी,कलावंत यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे,विदर्भ विभागीय सचिव प्रा.मिलिंद रंगारी,नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,नागपूर विभागीय सदस्या कवयित्री सरिता रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम,कवी वसंता चौधरी,कवी सुनील बावणे,कवी प्रकाश पिंपळकर, कवी महेंद्र मंडपे, कवी गजानन माद्यसवार कवी संतोष उईके, कवीप्रवीण आडेकर, कवी नरेंद्र कन्नाके(नीरजकार), कवी परमानंद तिराणिक, अतुल येरगुडे, सौ.भारती लखमापुरे, सौ. मंजुषा दरवडे  अरुण आगलावे  कवी विशाल मोहूर्ले, कवयित्री सोनाली रायपुरे(सहारे), किशोर चलाख,दुशांत निमकर,महेश भामरे तसेच आशिष धोटे,योगेश बारेकर,दयाराम वंजारी,जगदीश पेंदाम,अमित काटवलकर,धर्मपाल मोहरकर आदींनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!