घोषित केलेले कन्हारगांव अभियारण्य रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - बल्हारपूर,पोम्बुर्ण,गोंडपीपरी तालुक्यातील वनविकास  महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील  कन्हरगांव,झरण धाबा, तोहंगाव वनक्षेत्राच्या 269 चौ.की.मी क्षेत्र अभयारण्य घोषित करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे आरक्षित अभयारण्य घोषित केल्यास तालुक्यातील ४२१४४ लोकांसख्या असलेली ३३गावे बाधित होणार आहेत. दररोज २७०० ते ३००० मजूर जंगलाच्या कामावर अवलंबून असतात. त्यामुळे या परिसरातील शेतकरी कष्टकरी व मजूर यांनाही रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे तेव्हा राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कन्हारगांव अभयारण्य प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अन्यथा अन्यथा वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर तर्फे व परिसरातील गावातील नागरीक तर्फे धरणे व मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.या वेळी धीरज बांबोले,जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर,व बाधित परिसरातील प्रमोद भीमराव कातकर,गणेश वित्तल चाचाने.विश्वनात मंडल.हेमंत कुसराम,अमोल नुसरवर,सत्यवान जीवने,अरुण धकाते,ज्ञानेश्वर मरस्कोले,विनोद पोंनलवार,संदीप जाधव,उत्तम मंडल यांच्या उपस्थितीत आज निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!