लाखांदूर तालुक्यात चढ्यादराने देशी दारुची सर्रास विक्री
परवानाधारक दुकानातून विक्री
मद्यपींमध्ये तिव्र नाराजी
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - दिनांक.२४/१२/२०२० लाखांदूर तालुक्यात शासनाने निर्धारित केलेल्या किमतिपेक्षा अधिक किमत आकारुन परवानाधारक देशी दारु दुकानातून चढ्या दराने दारुची सर्रास विक्री केली जात असल्याने लाखांदूर तालुक्यातील मद्यपिंमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहिती नुसार लाखांदूर तालुक्यात जवळपास १०देशी दारुची किरकोळ विक्रीचे परवानाप्राप्त दुकाने आहेत.या दुकानातून नियमित देशी दारुची किरकोळ विक्री देखील केली जात आहे.मात्र सदर विक्री होतांना 1८० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटल ची शासन निर्धारित ५२ रु.किमत असतांना या दुकानातून चक्क 8रु अधिक वसुल करीत 60रु.दराने तर ९० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटल ची २६ रु.किमत असतांना ९रु.अधिक वसुल करीत ३५ रु.मध्ये विक्री केली जात असल्याची बोंब आहे.यासबंध गैरप्राकाराची शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती असुनही हेतुपुरस्पर डोळेझाक केल्या जात असल्याचा आरोप मद्यपी जनतेत केला जात आहे.दरम्यान सदर परवानाधारक दुकानांतर्गत चढ्या दराने देशी दारुची विक्री केली जात असल्याने अवैध दारु विक्रेत्यांच्या दारु विक्रीच्या दरातही कमालीची वाढ झाल्याची चर्चा आहे.सद्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने निवडणूक असलेल्या गावात सद्या मद्यपी मतदारांना सुगीचे दिवस आल्याचे बोलल्या जात आहे.मात्र देशी दारुच्या किमतीत परवानाधारक दुकानदारांनी कृत्रीम दरवाढ केल्याने मद्यपिमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन चढ्या दराने विक्री करना-या दुकानांविरोधात कारवाई करुन शासन निर्धारित किमतीत देशी दारुची विक्री होन्याहेतू आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील बहुतांश मद्यपिंनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!